Breaking News

अय्यप्पा मंदिरात मंडल महापूजा उत्साहात


नगर । प्रतिनिधी -
सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिराचा रौप्य महोत्सव सुरू असून, 60 दिवसांच्या मंडल, मकर पूजा उत्सवात मंडलपूजा मोठ्या उत्साहात झाली.

केरळमधील शबरीमलाच्या मुख्य उत्सवाच्या धर्तीवर हा उत्सव नगरमध्ये केला जातो. यानिमित्त पहाटे महागणपती हवन झाले. दुपारी महिला व पुरुष भाविकांनी मंदिर परिसर फुलांनी सजविला. संध्याकाळी प्रोफेसर कॉलनी जवळील महालक्ष्मी मंदिर ते अय्यप्पा मंदिर अशी सावेडीतून भव्य शोभायात्रा (तालापोल्ली) काढण्यात आली. 

नंतर दीपआराधना झाली. आरतीनंतर पुष्पाभिषेक करण्यात आला नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद (गोड जेवण) देण्यात आला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. शेवटी हरी वरासम होऊन एक एक दिवा बंद करून अंधार करण्यात आला. हे दृश्य अतिशय मनमोहक होते. 

अय्यप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या या दोन महिन्याचा उत्सवात रोज पूजा व महाप्रसाद असतो. 14 जानेवारीला मकर विलक्कु उत्सवाने उत्सवाची सांगता होणार आहे.