Breaking News

मंत्रालयाच्या दारातच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न


मुंबई/ प्रतिनिधीः
मुंबईतील मंत्रालयाच्या दारातच एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही महिला चेंबूरची असून तिने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले राज्य राखीव दलाचे जवान, हवालदार डी. के. माने, पोलिस शिपाई के. डी. राऊत यांनी वेळीच महिलेच्या हातून रॉकेलची बाटली काढून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड न करता आल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच खासगी सावकाराने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला असाही आरोप या महिलेने केला आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात मंत्रालय परिसरात एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आता आज एका महिलेने कर्जाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी तिच्याकडे धाव घेतली आणि तिला आत्महत्या करण्यापासून रोखले. राधाबाई साळुंखे असे या महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या बीडच्या आहेत.