Breaking News

निष्क्रीय आमदारांचा निवडणुकीत जनता हिशोब करील : धैर्यशील कदम


औंध (प्रतिनिधी) : आम्ही केलेल्या विकासकामांची मापे काढण्याअगोदर पाच वर्षांत तुम्ही काय दिवे लावले ते जनतेपुढे स्पष्ट करा. पराभवाच्या भीतीने स्वताची निष्क्रीयता लपवण्यासाठी आमदार जनतेची दिशाभूल करीत आहेत. मात्र कराड उत्तर मधील सुज्ञ जनता विधानसभा निवडणुकीत निष्क्रीय आमदारांचा नक्की हिशोब करेल. अशी घणाघाती टीका वर्धन अँग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी केली.

पुसेसावळी (ता. खटाव) येथे नागरी सुविधा योजनेतून मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. जि. प. चे समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता कदम, पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री कदम, सरपंच सौ. मंगल पवार, श्रीकांत पाटील, प्रभाकर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. कदम पुढे म्हणाले की, माझी बांधीलकी येथील जनतेशी आहे. त्यामुळे मी केलेल्या कामाचा हिशोब जनतेला नक्की देईन. मी केलेल्या विकासकामावर जनतेचा विश्‍वास आहे. म्हणूनच जनतेने 60 हजार मते देऊन माझ्यावर विश्‍वास टाकला आहे मी केलेल्या विकासकामांची भीती वाटत असल्याने कर्‍हाड उत्तर मतदारसंघाचे आमदार विकासकामावर बोलण्यापेक्षा आमच्या कामाची मापे काढत फिरत आहेत. आमच्या कामांची अलर्जी झाल्यामुळे आम्ही केलेल्या 150 कोटी रुपयांची विकासकामे तुम्हाला दिसत नाहीत हे दुर्दैव आहे. उलट आमचे जिल्हा परिषद सदस्य, व नियोजन विकासमधून मंजूर झालेल्या व युतीच्या शासनाने मंजूर केलेल्या कामांचे नारळ आपण अधिकार्‍यांना दम देऊन फोडत आहात. 

ार वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी भरीव निधी आणण्यात कमी पडला याचा जाब जनता विचारेल या भीतीने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी दुसर्‍यांच्या कामाकडे बोट दाखवून आहात. परंतू जनता येणार्‍या काळात तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी लगावला.