Breaking News

स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश नगर पालीकेच्या रूग्णालयाला मिळाला औषध साठा


बुलडाणा, (प्रतिनिधी) बुलडाणा शहरातील जौहार नगर प्रभाग क्र 2 मध्ये असलेल्या नगर पालि केच्या रूग्णालयात मागील अने म हीण्यापासून औषध् साठा नव्हाता त्यामुळे  या भागातील नागरीकांना या रूग्णालयाच्या काहच  फायदा होत नव्हता. रूग्णांना खाजगी रूग्णालयात जावून महागडे उपचार घ्यावे लागत होते. यावर  स्वाभिमानीचे  अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा प्रमुख शे. रफीक शे. करीम व पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांनी वेळोवेळी नगर पा लीकेकडे विनंती अर्ज् करून औषध साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या या मागण्याकडे पा लीकेने सातत्याने दुलर्क्ष केले. अखेर शे. रफीक शे.करीम व राणा चंदन यांनी प्रभागातील नागरीकांना सोबत घेवून आंदोलन केले.

वेळोवेळी ठि य्या आंदोलन तसेच पालीकेवर नागरीकांचा मोर्चा काढला होता. एवढेच नव्हे तर पालीकेने तातडीने औषध साठा उपलब्ध करून न दिल्यास दवाखान्यावर ताबा मिळवून औषध वाटप करून देण्याचा इशरा दिला होता.  तब्बल पाच ते सहा महीण्यापासून हे आंदोलन सुरू होते. वि शेष म्हणजे या आंदोलनाच्या दरम्यान या भागातील नगरसेवक व विदयमान नगराध्यक्ष यांनी मुस्लीम समाजाच्या या महत्वाच्या मागीणीकडे मुदाम दुर्लक्ष  केले होते. त्यामुळे विदयमान अध्यक्ष पती मो. सज्जाद यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. अखेर शे. रफीक शे. करीम यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे या भागातील नागरीकांची समस्या सुटली. 8 जानेवारी रोजी पालीकेचे मख्याधीकारी वाघमोडे व डॉ. पाटील मॅडम यांनी रूग्णालयाला औषध साठा उपलब्ध करून दिला. त्यामुळे या भागातील नागरीकांनी शे. रफीक शे. करीम यांचे अभिनंदन केले. जे काम स्थानीक नगरसेवक व नगराध्यक्षांचे होते. ते काम स्वाभिमानीने करून दिल्यामुळे नागरीकांनी त्यांचे अभिनंदन केले. यापुढे काम करणार्‍या व्यक्तीलाच मतदान करून त्यांननिवडून दयायचे असा निर्धार करीत नागरीकांनी नगरसेवक व नगराध्यक्षाचा निषेध नोंदविला. यावेळी शे. र फीक शे. करीम, राणा चंदन, हरीभाउ उबरहंडे, शे. मुजीब, सै. जयरोददीन, अजगर शाह, मिश्कीन शाह, शे. सलीम, यांच्यासह मुख्याधीकारी वाघमोडे, डॉ. पाटील व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.