Breaking News

गुणवंत विद्यार्थ्यांचा भरतगाव येथे गोैरव


नागठाणे (प्रतिनिधी) : भरतगाव (ता. सातारा) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गोैरव करण्यात आला. सरपंच अश्‍विनी चव्हाण यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण कुंडले, समीर शेडगे, शर्वरी शेडगे यांचा स्मृतिचिन्ह, पदक देऊन सत्कार करण्यात आला. 

पोलिस पाटील प्रताप शेलार, सुरेश शेडगे, समाधान शेडगे, प्रदीप पाटील, संतोष जाधव, प्रमोद देशमुख आदींची उपस्थिती होती. संतोष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सदाशिव चव्हाण, प्रकाश चव्हाण, सर्जेराव चव्हाण, सुशील चव्हाण, जयदीप सावंत, सुनील बोभाटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.