Breaking News

परिवहन मजदुर युनियनच्या विभागीय अध्यक्षपदी बनसोडे यांची निवड
बुलडाणा,(प्रतिनिधी): कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संलग्न महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियनच्या विभागीय अध्यक्ष्यपदी कडुबा बनसोडे, सचिवपदी अशोक दाभाडे तर कार्याध्यक्षपदी पुरूषोत्तम खरात यांची निवड करण्यात आली.

कास्ट्राईब कर्मचारी महासघ तथा परिवहन मजदूर युनियनचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे, नागपूर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलडाणा विभागातील मागासवर्गीय कर्मचारी, कामगार यांच्या सेवाभरती, पदोन्नत्या, बदल्या, गोपनीय अहवाल यासारख्या संवेदनशील प्रश्‍नांवर रा.प. प्रशासनासोबत निर्णायक चर्चा करण्यासाठी अध्यक्ष्य कडुबा बनसोडे, सचिव अशोक दाभाडे तर विभागीय कार्याध्यक्ष पुरूषोत्तम खरात यांची निवड केली आहे.त्यांच्या निवडीबद्दल एस.टी.तील कामगारांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.