Breaking News

थोरातांच्या जीवनकार्यातून विद्यार्थ्यांना स्फुर्ती - खरात; गावोगावी प्रबोधन रथातून जागर


संगमनेर/प्रतिनिधी
विद्यार्थी दशेत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेवून देश कार्यासाठी झटणार्‍या स्व.भाऊसाहेब थोरातांनी स्वातंत्र्यानंतर सहकारातून तालुक्याचा विकास साधला, गोरगरिबांच्या विकासाची तळमळ, ध्येय, तत्व, शिस्त अशा त्यांच्या जिवन कार्यातून विद्यार्थ्यांना नक्कीच स्फुर्ती मिळणार असल्याचे प्रतिपादन आदिवासीसेवक प्रा.बाबा खरात यांनी केले आहे.

स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त जयहिंद आश्रमशाळा कोळवाडे येथे विचार व प्रबोधन जागर रथ यात्रेत ते बोलत होते. यावेळी इंद्रजित थोरात, दशरथ वर्पे, रामहरी कातोरे, बाळासाहेब उंबरकर, शिवाजी कांबळे, शिवराम बिडवे, सत्यानंद कसाब, जगन बर्डे, बाबासाहेब बर्डे,संपत चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी साकूर, रणखांब, चंदनापूरी, चिखली, चिकणी आदी शाळांमध्ये विविध स्फुर्तीदायी गितांचे गायन करुन प्रबोधन करण्यात आले. यावेळी प्रा.बाबा खरात म्हणाले कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य, विचार नव्या पिढीला समाजावून सांगून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक जीवनात वाटचाल करावी. या हेतूने ही प्रबोधन यात्रा, विचार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, सहकार, शेती, पर्यावरण, जलसंधारण अशा वेगवेगळ्याा क्षेत्रात भरीव कार्य केले. समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या भाऊसाहेबांनी आयुष्यभर नितीमुल्ये व तत्वे जपली. आपल्या शिस्तप्रिय काटसरीच्या तत्वांनी एक आदर्शवत वाटचाल निर्माण केली. शेतकर्‍यांसाठी अनेक मोर्च त्यांनी काढले. 12 जानेवारी हा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिवस असून या काळात संगमनेर तालुक्यात अनेक कार्यक्रम राबवित असतो. स्व.भाऊसाहेब थोरातांच्या विचारांचा जागर करण्यासाठी प्रेरणा दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी यात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य व योगदान द्यावे. असे ही ते म्हणाले. यावेळी दशरथ वर्पे म्हणाले कि, दादांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांविरुध्द लढा दिला.जिवनात त्यांनी गांधीवादी विचार,शिस्त,साधी राहणी,वाचन त्यांनी कायम जपले. नाशिकच्या तुरुंगात डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या बरोबर सामुदायिक वाचन केले.त्यातून वाचनाची आवड आणखी वाढली.त्यातून सहकाराची संकल्पना वाढली. तालुक्यात सहकारातून समृध्दी निर्माण केली. सहकार, शिक्षण,शेती,पर्यावरण,समाजकारणात त्यांनी आयुष्यभर काम केले.प्रा.बाबा खरात यांनी त्यांच्या विचाराचा सुरु केलेला जागर कौतुकास्पद असल्याचे ही ते म्हणाले. याप्रसंगी कलापथकाने विविध स्फूर्तीगिते सादर केली. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी, युवक,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.