Breaking News

महिलांनी प्रवेश केल्याने शबरीमला मंदिराचे शुद्धीकरण!


पथनमथिट्टा (केरळ) : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वच वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रथमच आज (ता. 2) दोन महिलांनी प्रवेश केला. दोन महिलांनी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश केल्यानंतर मंदिर प्रशासनाने प्रवेश बंद करून शुद्धीकरण केले. दोन महिलांनी अत्यंत कडेकोट बंदोबस्तामध्ये प्रवेश केल्याचे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले. 


शुद्धीकरण झाल्यानंतर शबरीमला मंदिराचे दरवाजे पुन्हा उघण्यात आले. वकिल बिंदू आणि कार्यकर्ती कनकदुर्गा या शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्‍या पहिल्या महिल्या ठरल्या. मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या मंदिर प्रवेशाला दुजोरा दिल्यानंतर मंदिर प्रवेशद्वार बंद करून शुद्धीकरण करण्यात आले. केरळच्या प्रसिद्ध शबरीमला मंदिराच्या गाभार्‍यात 50 वर्षाखालील दोन महिलांनी बुधवारी (ता.2) प्रवेश केल्याचा दावा केला आहे. साध्या वेशातील पोलिसांच्या मदतीने बिंदू आणि कनकादुर्गा या दोन महिलांनी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश केल्याचा दावा केला. या महिलांनी गाभार्‍यात प्रवेश केल्यानंतर व्हॉटसअपवर रेकॉर्डिग केले. मध्यरात्री त्या दोन महिलांनी शबरीमला मंदिरात दर्शनासाठी प्रस्थान केले आणि पहाटेच्या सुमारास त्यांनी दर्शन घेतल्याचा दावा केला.
केरळमधील शबरीमला मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा खंडित करत दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केला. या महिलांना मंदिरात प्रवेश करताना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे पिनराई विजयन यांनी म्हटले आहे. या दोन्ही महिलांनी मंदिरात प्रवेश करून भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले. याआधी शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यास महिलांना बंदी होती; मात्र आता कोणत्याही अडथळ्याशिवाय महिला या मंदिरात प्रवेश करू शकतील, असे त्यांनी सांगितले. बिंदू आणि कनकदुर्गा (दोघींचेही वय 42) अशी या दोन्ही महिलांची नावे आहेत. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता या महिलांनी मंदिरात प्रवेश केला. त्या दोघींनीही काळे कपडे परिधान केले होते आणि तोंडही झाकले होते. व्हिडिओ फुटेजमध्ये भगवान अयप्पांसमोरील 18 पायर्‍या चढल्या नसल्याचे दिसून येते. तब्बल 41 दिवसांच्या उपवासानंतर त्या 18 पायर्‍या भक्तांकडून चढल्या जातात. त्या महिलांनी बाजूच्या प्रवेशद्वारातून दर्शन घेतले. ते प्रवेशद्वार व्हीआयपी आणि माध्यमांमाठी प्रवेशासाठी वापरण्यात येते. 
या महिला उत्तर केरळमधील आहेत. मागील आठवड्यात त्यांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता; पण जबरदस्त विरोध झाल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्य ावर्षी ऐतिहासिक निर्णय देताना सर्वच वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिला होता. त्या निर्णयाला केरळमधील अयप्पा भक्ताकंडून तसेच सनातनी संस्थांकडून विरोध सुरू आहे. 
चौकट
विनाशकाल; परंतु कोणाचा?
ःःःःःःःःःःःःःःःःःःः..
दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यानंतर भाजपने मात्र ही घटना म्हणजे विनाशकालाची सुरुवात आहे, असे म्हटले. विनाशकाल त्या महिलांचा, केरळ सरकारचा, की भाजपचा अशी चर्चा आता सोशल मीडियातून सुरू झाली आहे.