Breaking News

वडिलांच्या स्मरणार्थ नेत्ररूग्णांना दिली नवी दृष्टी; वाघोलीतील भोईटे कुटूंबियांनी जपली सामाजिक बांधिलकी


\वाई (प्रतिनिधी) : वाई ग्रामीण रुग्णालय नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. विठ्ठल भोईटे यांचे त्यांचे वडील (कै.) नरसिंगराव खाशाबा भोईटे पुण्यतिथी औचित्य साधत घेतलेल्या नेत्ररोग शिबिराने वाई तालुक्यासह कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक वृध्द रुग्णांना भोईटे कुटुंबांकडून मिळाला चष्म्याचा आधार दिला. त्यानिमित्तातने वाघोली येथील विठ्ठल भोईटे व त्यांचे बंधू विजय भोईटे, जगनाथ भोईटे, सुहास भोईटे, सतीश भोईटे, जयवंत भोईटे यांनी आपल्या वडीलांच्या सामाज सेवेच्या कार्याचा वारसा त्यांच्या मृत्यूनंतरही कायम जपला आहे. 


नरसिंगराव भोईटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी ग्रामीण भागात मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून वडिलांच्या कार्याचे ऋण फेडतात. सामाजिक बांधिलकी जोपासत पितृ प्रेमाचा वेगळा आदर्श भोईटे कुटूंबियांनी वाघोली परिसरात निर्माण केला आहे. मोतीबिंदू मुक्तमहाराष्ट्र अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय पिंपोडे, शासकीय रुग्णालय सातारा व टेके संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली, ता. कोरेगाव येथे घेतलेल्या नेत्र तपासणी शिबिर व नेत्रदान प्रबोधन कार्यक्रमात एकूण 850 रूग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी 450 रूग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. शिबिरातील 72 रूग्णांवर सिव्हिल हाँस्पिटल सातारा येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच डोळ्यावर वेल वाढणे, तिरळेपणा व मोतिबिंदूच्या 15 रुग्णांवर सांगली येथे शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी दिली 


जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत काटकर, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. आधाते मॅडम यांच्या सहनेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. विठ्ठल भोईटे, डॉ. सतीश बाबर, वाई उद्योजक कृष्णा भोसले मुंबई, राजेंद्र शिळीमकर नगरसेवक पुणे मनपा अ‍ॅड. शिवाजी भोईटे पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


नेत्र शिबिर यशस्वी होण्यासाठी नेत्र चिकित्सा अधिकारी मिलिंद शिंदे, डि. एस खंडागळे, पिसे, उमेश मुळे तसेच पिंपोडे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व निलेश भोईटे, स्वप्नील भोईटे, राहुल भोईटे व वाघोली ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.