Breaking News

देशासाठी सेवा करण्यातच खरा आनंद ः हजारे
  पारनेर/प्रतिनिधी
 मनुष्य हा कधीच निवृत्त होत नसतो त्याला सेवेसाठी ठरवून दिलेले हे वय आहे, आपण करत असलेली सेवा संपली तर देशाची सेवा करा आणि त्यातच खरा आनंद असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
   जातेगाव ता. पारनेर येथे रविवार दि.30 रोजी जलसंपदा विभागाचे स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक चंद्रकांत सिताराम ढोरमले यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ आयोजित केला होता याप्रसंगी हजारे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, अ‍ॅड. श्यामजी आसावा, कार्यकारी अभियंता सुभाष कोळी, स्वप्निल काळे, अण्णासाहेब शेलार, रविंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रकाश लंकेश्‍वर, डी आर खोसे, ज्ञानदेव हिरवे, माणिकराव साळवे, पोलीस उपनिरीक्ष विनोद चव्हाण, बेलवंडी सेवा सोसायटीचे अध्यक्ष दिनेश(आबा) इथापे, स्नेहालयाचे अनिल गावडे, पिंपरी चिंचवडचे मा.नगरसेवक मारूती भापकर, प्राध्यापक संजय डफा, यु के स्नेहालय संस्थेचे विश्‍वस्त निक फॉक्स, सुझर लॅन्डचे ऑक्सर बंडू(आण्णा) पारखे, राजू गुजर, माजी सरपंच सुभाष ढोरमले, सेवा सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय ढोरमले, भैरवनाथ देवस्थान ट्स्टचे अध्यक्ष अर्जुन बढे, उपाध्यक्ष विजय जर्‍हाड, राजेंद्र रसाळ, शरद पवार आदी उपस्थित होते. यावेळी जातेगाव ग्रामपंचायत, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्यावतीने ढोरमले यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केशव कातोरे यांनी केले तर सर्वांचे आभार सचिन ढोरमले यांनी मानले.