Breaking News

भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना करणार्‍यांचा निषेध


शेवगाव/प्रतिनिधी - भगवान बाबांच्यां मूर्तीची विटंबना करणार्‍यांचा आज शेवगाव शहरामध्ये समस्त वंजारी समाजाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. मूर्तीची विटंबना करणार्‍या स्वप्नील शिंदे    याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी तालुक्यातील समस्त वंजारी समाजातील युवकांनी तहसीलदार तसेच शेवगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी वंजारी समाजाच्यावतीने घोषणाबाजीही करण्यात आली तसेच जे कोणी यामध्ये दोषी आहेत, त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.


यावेळी नगरसेवक अरुण मुंढे, संजय नांगरे, गंगा खेडकर, नितीन फंदे, रवी उगलमुगले, नितीन बडधे, मंगेश पाखरे, अशोक वनवे, भास्कर बडधे, अप्पू लाड, अंकुश ढाकणे, बंडू महाजन, अमोल खेडकर, अब्बास कुसळकर, राजू नाईक, विशाल खेडकर, अमोल शेवाळे, संदीप बडे, प्रवीण ढाकणे, भक्तराज बटूळे, सुहास    गर्जे, रामदास बडधे, शिवाजी जायभाये, संदिप बडे, रवींद्र केदार, जालिंदर फुंदे, जगन्नाथ गुठे, ज्ञानेश्‍वर खबाले, अविनाश ढाकणे, संपत घुगे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.