Breaking News

प्रा. एन. व्ही. शिंदे यांना शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान


सातारा : येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील प्राध्यापक एन. व्ही. शिंदे यांना मुंबई येथे नुकताच शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 


यावेळी एकनाथ बिरवटकर, शंकर शिंदे व संपादक अभिजित राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कला, शिक्षण, साहित्य, संस्कृती आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. शिंदे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य अरुण गाडे, प्रा. विलास वहागावकर यांनी अभिनंदन केले.