Breaking News

थकलेले तुर,उडीदाचे चुकारे तात्काळ मिळणार


चिखली,(प्रतिनिधी):   मागिल वर्षी शासनाची खरेदी केंद्र असलेल्या नाफेडने नियुक्त केलेल्या जिनींग प्रसिंग या संस्थेला शेतकर्‍यांनी आपले तुर व उडीद मोजुन दिला. मात्र माल विकल्या नंतरही संबंधीत शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे वर्ष उलटुन गेले तरी  मिळालेले नाही. पैसे मागावयास गेलेल्या शेतकर्‍यांना विविध कारणे दाखवून पैसे देण्यासाठी टाळले जाते आहे.

या पैशासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी संस्थेच्या कार्यालयावर वारंवार चकरा मारून प्रसंगी उपोषण व आंदोलने करूनही त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे हे पैसे तत्काळ शेतकर्‍यांना चूकते करावे यासाठी चिखलीचे  आमदार राहुल बोंद्रे यांनी तडक पणन संचालकाचे कार्यालय गाठुन राज्याचे पणन संचालक दिपक तावरे यांची  7 जानेवारी रोजी भेट घेवुन शेतकर्‍यांचे पैसे तातडीने मिळण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरला, असता याप्रकरणी तात्काळ कार्यवाही करून शेतकर्‍यांचे पैसे त्यांना मिळतील अशा स्वरूपाचे आदेश निर्गमीत केल्या गेले. गेली वर्षभर शेतमालाच्या चुकार्‍यासाठी ताटकळेल्या शेतकर्‍यांना पणन संचालकाचे या निर्देशानंतर पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने, आपला शेतमाल विकुनही हक्काच्या पैशापासुन वंचित राहीलेल्या शेतकर्‍यांना आमदार राहुल  बोंद्रे यांच्या या प्रयत्नामुळे दिलासा मिळणार आहे.