Breaking News

भरवस्तीत ऊसाची ट्रॉली पलटी सुदैवाने जिवित हानी टळलीचांदा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील चांदा येथे भर वस्तीत ऊसाने भरलेला ट्रॉली पलटी झाला पण सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चांदा येथून एक ऊसाने भरलेला ट्रॉली चांदा माका रस्त्याने निघाला पाण्याच्या टाकी जवळ जुन्या बारवे जवळून मेन रोडने हा टॅक्टर जात असताना टॅक्टर चालक टॅक्टर वळवण्याच्या नादात ऊसाने भरलेला ट्रॉली जागेवर पलटी झाला. दुपारची असल्याने या ठिकाणी वर्दळ कमी होती. ज्या ठिकाणी ट्रॉली पलटी झाला. त्या ठिकाणी रस्त्या लगत अनेक घरे आहेत. सकाळची वेळी व सायंकाळची वेळी जास्त गर्दी त्या परिसरात राहते त्यावेळेस जर ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता त्या ठिकाणी रस्ता देखील अनेक दिवसापासून खचलेला आहे. या रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे ऊसाची वाहतूक करताना वाहन चालवणार्‍यांना मोठी कसरत करावी लागते पलटी झालेल्या ट्रॉली टॅक्टर चालक मात्र या अपघातातून वाचला.