Breaking News

मुख्यमंत्री चषक’ला पारनेरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादपारनेर/प्रतिनिधी
राज्यभरात सुरू असलेल्या सीएम चषक स्पर्धेला पारनेर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन चेअरमन हसन राजे यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी बाळासाहेब नरसाळे, विश्‍वनाथ कोरडे, सुभाष दुधाडे, मार्तंडराव बुचुडे, वसंत चेडे, चंद्रकांत चेडे, भिमा औटी, तुषार पवार, सागर मैड, आदी मान्यवर उपस्थित होते. 

जिल्ह्यात अकोले प्रथम तर पारनेर तालुका दुस क्रमांकावर आहे. ‘सीएम चषका’च्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असून यापुढेही तालुका क्रीडा असोसिएशनच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन भाजपाचे माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरसाळे यांनी केले. 
जिल्ह्यात अकोले तालुक्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. त्यापाठोपाठ पारनेरमध्ये स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पारनेरमध्ये सुरू असलेल्या सीएम चषक स्पर्धेत राहुरी, संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर, सह आठ संघ व मुलींच्या दोन संघानी सहभाग नोंदविला होता. सुमारे साडेसहा हजार स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. कुस्ती, धावणे, कब्बड्डी, खो-खो, हॉलीबॉल आदी स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धाच्या नियोजनासाठी भाजप माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरसाळे व तालुका युवा मोर्चाचे तुषार पवार, सागर मैड, समालोचक ञषिकेश चेडे, विश्‍वास रोहोकले ,काशीनाथ नवले, विलास तराळ,या संयोजकांनी परिश्रम घेउन या स्पर्धा यशस्विपणे पार पाडल्या.