Breaking News

निर्मल ब्राईट फ्यूचर स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेनल


शेवगाव श./प्रतिनिधी 
निर्मल ब्राइट फ्युचर स्कूल (सी. बी. एस. ई.) निर्मलनगर, शेवगाव शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मयुर वैदय, तर सुशील तावडे शेवगाव हे होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे प्रा. प्रकाश व्यास यांनी करून विदयालयाचा प्रगती अहवाल सादर केला. तसेच निर्मल ब्राइट फ्युचर स्कूलच्या विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयास दिल्लीकडून मान्यता मिळाल्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. तसेच ‘निर्मलाताई काकडे गर्ल्स स्कॉलरशिपची’ रोख बक्षीस रक्कम गुणवंत विद्यार्थ्यीनींना देऊन त्यांचाही गौरव केला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या सुप्त कला गुणांचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमास पालकांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती व त्यांनी नूतन वर्षारंभास विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.