विद्यार्थ्यांना स्पर्धेतून यशाची महत्वपूर्ण दिशा मिळते : आमदार डॉ.खेडेकर


देऊळगांवराजा,(प्रतिनिधी): पत्रकारिता क्षेत्रात काम करत असतांना दैनदिन कामकाजा सोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारा पत्रकार हा सामाजिक चळवळीचा मुख्य प्रवाह म्हणून आपले कार्य नेहमी प्रामाणिकपणे सुरु ठेवतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत खडे बोल बोलन्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धेतून यशाची महत्वपूर्ण दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केले.

ते देऊळगांवराजा तालुका पत्रकार संघाच्या वकृत्व स्पर्धेच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. प्रमुख अतिथि म्हणून तहसीलदार दिपक बाजड, पोलीस निरीक्षक सारंग नवलकार, गजेंद्र शिंगणे, समाधान शिंगणे, सरपंच सविता शिंगणे, तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी शिंगणे,  गुलाबराव शिंगणे, देऊळगांव अर्बन अध्यक्ष रविंद्र कोटेचा, राजू चित्ते, मन्नानखाँ पठाण, डॉ.महेश दंदाले, जगदीश कापसे, पत्रकार सुषमा राऊत, सय्यद सईद, प्राचार्य सचिन खरात, वामनराव शिंगणे, सुभाष शिंगणे, अंनथा इंगळे, अशोक पाबळे, कावेरी पडघान, संदीप राऊत, स्वप्नील शहाणे, सुनिल दंदाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलतांना आमदार डॉ. खेडेकर म्हणाले की, पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामजातील विविध दुर्लक्षित समस्या मांडत त्या शासनापर्यंत कशा पोहचतील यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी तहसीलदार दिपक बाजड,नायब तहसीलदार मदन जाधव,पोलीस निरीक्षक सारंग नवलकार, यांनी देखील मनोगत व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त स्थानिक सर्व शाळेतील वर्ग 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांची सात विषयाची वकृत्व स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत 14 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शरदचंद्र पवार जूनिअर कॉलेज वर्ग 12 वीचा विद्यार्थी वशीम शहा याने प्रथम बक्षीस 1111 रुपये व सन्मानचिन्ह पटकावले. तर द्वितीय बक्षिस विद्यार्थिनी शितल डोईफोडे 777 रुपये व सन्मानचिन्ह व तृतीय बक्षीस श्री.शिवाजी विद्यालयाची वर्ग 9 वा विद्यार्थिनी वैष्णवी रायकर हिने 555 रुपये सन्मानचिन्ह व प्रोत्साहनपर बक्षीस स्वामी विवेकानंद विद्यालय वर्ग 9 वा विद्यार्थिनी पूनम बनसोडे हिला देण्यात आले. देऊळगांवराजा नायब तहसीलदार पदावर कार्यरत असतांना गेल्या अनेक वर्षापासून इरादा फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मदन जाधव यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर देऊळगांवमही नगरीत गेल्या पाच वर्षापासून पोलीस क्षेत्रात विविध गुन्ह्यातील तपासाला गती देणारे व सामाजिक एकात्माता जोपासणारे पोलीस चौकीचे इन्जार्च अकील काझी यांना देखील सन्मानचिन्ह देऊन तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदिप हिवाळे  तर सूत्रसंचालन सुनिल मतकर यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक जोशी, उपाध्यक्ष शेख उस्मान, सचिव सूरज गुप्ता, कार्याध्यक्ष विलास जगताप, सदस्य मुशीरखान कोटकर, सुनिल मतकर, संतोष जाधव, गणेश डोके, गजानन तीडके, गजानन गोरे, अर्जुन आंधळे, लक्ष्मण दंदाले, गजानन घुगे, राजेश खांडेभराड, खंडू मांटे, शिवाजी वाघ, राजू पंडित, मो.जमील, मंगेश तिडके उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष जाधव अमोल बोबडे, शेख.उस्मान यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget