Breaking News

रास्त मागण्या मंजूर करण्यास शासनास भाग पाडा : दिलीपकुमार सानंदा


खामगाव,(प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषद कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहे. सदर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता खामगांव नगर परिषद कर्मचारी संघटनेसह राज्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतीमधील कर्मचार्‍यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारी 2019 पासुन काम बंद आंदोलन करुन संप पुकारला आहे. येथील नगर परिषद कार्यालयासमोर सुरु असलेल्या खामगांव नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या सुरु असलेल्या संपाला माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी भेट दिली व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व नगर पालीकेमधील काँग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने न.प.कर्मचारी संघटनेच्या संपाला आपला पाठींबा दिला. 

यावेळी नगर परिषद काँग्रेस पक्षनेता अर्चनाताई टाले, नगरसेवक अमेयकुमार सानंदा, सुभान खॉ इब्राहिम खाँ, खामगांव नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत निळे, शहर अध्यक्ष मोहन अहिर, शहर अध्यक्ष ईश्‍वर सारसर, सफाई युनियनचे अध्यक्ष नारायण सारसर, दुर्गासिंह ठाकुर, राजेंद्र तिवारी यांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, संपुर्ण जगामध्ये नवीन वर्षाचा जल्लोष साजरी करीत असतांना विकासामधील महत्वाचा घटक असलेल्या न.प.कर्मचार्‍यांना आपल्या रास्त मागण्यांसाठी रस्त्यावर बसावे लागत आहे. ही बाब निषेधार्ह आहे. न.प.सफाई कर्मचारी जनतेच्या आरोग्याची काळजी घेतो, त्याला मेडीकल क्लेम हा मिळालाच पाहिजे व तो त्याचा हक्क आहे. न.प.कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागु करणे यासह न.प.कर्मचारी संघटनेच्या इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत. गेल्या अनेक वर्षापासुन या मागण्या प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातुन कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप ही एक सुवर्ण संधी आहे. एकीचे बळ हे हत्तीच्या बळाप्रमाणे असते. अभी नही तो कभी नही म्हणुन न.प.कर्मचार्‍यांनी कोणत्याही आमीषाला बळी न पडता आपल्या मागण्या रेटुन धराव्या व त्या मागण्या मंजुर करण्यास शासनास भाग पाडावे, असे सानंदा यांनी सांगितले व कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनाला खामगांव मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने नगर परिषदेमधील काँग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने आपला पाठींबा दिला. माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा यांनी गुलाबपुष्प व मिठाई देउन न.प.कर्मचार्‍यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक मो.नईम, मो.वसीमोदद्ीन, बबलु पठान, तुषार चंदेल, प्रितम माळवंदे, वासुदेव कानकिरड यांच्यासह नगर पालीकेतील कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, न.प.कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.