कोळशाचा ट्रक लोणंदनजिक उलटला


लोणंद (प्रतिनिधी) : येथून शिरवळकडे जाणार्‍या रस्त्यावर अर्धवट रस्त्यामुळे कोळशांचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने जीवितहानी टळली. लोणंद शिरवळ रस्त्यावर एमआयडीसीजवळ असलेल्या विनायक गॅस एजन्सीसमोर मंगळवारी दुपारी लोणंदकडून शिरवळच्या दिशेला जात असलेला कोळशाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच 12 एनएक्स 7259) हा अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या एका बाजूला साईडपट्टीच नसल्याने पलटी झाला. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने वाहन चालकाला कसलीही दुखापत झाली नाही. शिरवळ ते लोणंद रस्त्याचे चौपदरीकरण गेले अनेक वर्षांपासून रखडले आहे. 

अनेक ठिकाणी रस्ता उखडलेल्या अवस्थेत आहे. वारंवार अपघात अनेकाना आपला जिव गमवावा लागला आहे तसेच अनेकाना अपगंत्व येऊन अनेकदा वाहनांचेही नुकसान होत असून चालकांनाही वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक वर्षे मागणी करूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget