Breaking News

सेंट सेव्हिअर्स कॅथ्रेडल चर्चमध्ये आज रात्री नववर्षाची उपासना


नगर । प्रतिनिधी -
तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स कॅथ्रेडल चर्चमध्ये खिस्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. नवीन वर्ष स्वागत कार्यक्रम व नवीन वर्षाची उपासना आज (सोमवार) रात्री होणार आहे.

सोमवारी संध्याकाळी 5 वाजता नवीन वर्षाच्या उपासनेमध्ये पूर्वसंध्या व बाप्तिस्मा विधी होणार आहे तर रात्री 11.30 ला संगीत महाविधी उपदेश होणार आहे. नूतन वर्षाच्या पहाटे 6.30 वाजता प्रभू भोजन विधी व सकाळी 8 वाजता संगीत महाविधी होईल. यावेळी उपदेश प्रिस्ट इन्चार्ज रेव्ह. जे. आर. वाघमारे देणार आहेत. दुपारी 2 वाजता चर्च सभासदांचा मेळावा होणार आहे.

शहरातील सेंट सेव्हिअर्स कॅथे्रडल चर्चची स्थापना 1883 मध्ये झालेली असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रिस्ट इन्चार्ज रेव्ह. जे आर वाघमारे, सचिव प्रशांत पगारे, खजिनदार केनिथ कालसेकर, कमिटी सदस्य जेम्स पटेकर, लाजरस पवार, किरण मते, सिसल भक्त, सरोजकुमार साळवे, व्हिक्टोरिया मते, निर्मला साठे, शैला कांबळे, माया जाधव, सतीश तोरणे यांच्यासह महिला मंडळ, युथ ग्रुप, शब्बाथ शाळा व समस्त मंडळी प्रयत्नशील आहेत.