Breaking News

हज यात्रेवरील जीएसटीच्या दरात कपातनवी दिल्ली : हज यात्रेवरील जीएसटीचे दर 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यापर्यंत कमी करण्यात आल्यामुळे हज यात्रेकरुंची अंदाजे 113 कोटी रुपयांची बचत होईल, असे केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथील आर. के. पुरम येथे हज विभागाचे नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थितांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

यावर्षी 2 हजार 300 हून अधिक मुस्लीम महिला मेहराम शिवाय (पुरुषांशिवाय) हज यात्रेला जाणार आहेत. स्वातंत्र्यांनतर ही प्रथमच वेळ आहे ज्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येत महिला मेहरामशिवाय हज यात्रेला जातील. जवळपास 2 हजार 340 महिलांनी हजयात्रेसाठी आत्तापर्यंत अर्ज केलेला आहे. तर, यावर्षी लॉटरी प्रणाली शिवाय महिलांना हज यात्रेला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वस्तू व सेवा करामध्ये कपात झाल्यामुळे विमान भाड्यातही लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे हज यात्रेची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे, असे नक्वी यावेळी बोलताना म्हणाले. मागच्या वर्षी 1 हजार 300 महिला हज यात्रेला गेल्या होत्या.