दुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर -उध्दव ठाकरे


बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्हा दुष्काळी दौर्‍यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे काल बीडमध्ये आले असता, शेतकर्‍यांसोबत संवाद साधत युतीवर भाष्य करत युतीची चर्चा खड्ड्यात गेली शेतकर्‍यांसाठी काय करता ते बोला असे आक्रमक खडेबोल सरकारला सुनावले.तसेच सत्ता असो,नसो मी शेतकर्‍यासोबत नेहमीच राहिल असे म्हणत शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे दाखवून दिले. येथील आर्शिवाद लॉन्स येथे शिवसेनेच्यावतीने शेतकर्‍यांसाठी धान्य, जनावरांसाठी चारा, पाण्याच्या टाक्यांचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे उध्दव ठाकरे असे म्हणाले, एक दुष्काळ मी हटवतो दुसरा (राजकीय) दुष्काळ तुम्ही हटवा, दुष्काळ गंभीर पण शिवसेना खंबीर, माणसांसाठी पाण्याच्या टाक्यांप्रमाणेच. जनावरांसाठी पाण्याचे हौदही शिवसेना देणार आहे., बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली, हे खरं आहे की खोटं ?,जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ?,ना तुम्ही शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला असून मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो तसेच खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, तुमचे दिवस राहिलेत तरी किती? असा सवाल करत पुढे ठाकरे म्हणाले की, सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय, मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही मग ते लेझिम पथक होतं का बँजो पथक !,केंद्रीय पथक येऊन गेलं, तुमच्या हातात काही मदत पडली का? असा सवाल उपस्थितीत शेतकर्‍यांना केला. तसेच दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ िदसायलाही यांना यंत्रणा लागते, स्वस्तामध्ये घर देईन नुसतं असं बोलून घर मिळतं का ?कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही. दिवाळीमध्ये रामदास कदम यांनी शिवसेनेतर्फे ५ हजार कुटुंबीयांना धान्य वाटप केले होते.

आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे असेही पंतप्रधान मोदींचे नाव न घेता ठाकरे बोलले. नवं वर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छी वर्षही येऊद्या अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. बीडमधील दुष्काळ गंभीर आहे. याची जाणीव शिवसेनेलाच आहे सरकारमात्र सुस्त आहे. युती होवो अगर न होवू शिवसेना नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार. कार्यक्रमात शेतकर्‍यांना उध्दव ठाकरे यांच्याहस्ते पाण्याच्या टाक्या, खाद्य पदार्थ, जनावरांचा चारा आदी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मंचावर पर्यावरणमंत्री रामदास कदम, मंत्री एकनाथ शिंदे, खा.चंद्रकांत खैरे, मंत्री अर्जुन खोतकर, आ.निलमताई गोर्‍हे, माजी मंत्री बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, प्रा.सुनिल धांडे,गोविंद घोळवे, युध्दजीत पंडित, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब अंबुरे, सुशिल पिंगळे, भाई संजय महाद्वार, मोहन शेरकर यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी तसेच शिवसैनिकांची उपस्थितीत होती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget