Breaking News

आश्‍वासने देऊन ढुंकूनही न पाहण्याची मोदीनीतीः पवार


बारामती/ प्रतिनिधीः
बळीराजाशी बेईमानी करणार्‍या भाजपला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आधी आश्‍वासने द्यायची आणि नंतर ढुंकूनही पाहायचे नाही, हेच मोदीराज्य अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर निशाणा साधला. 

बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
र दहा टक्के आरक्षणात ग्रामीण विद्यार्थ्यांचा निभाव कसा लागणार असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला. या सरकारने शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाचे हीत पाहिले नाही. त्यांना या घटकांशी काहीही घेणेदेणे नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत; मात्र सरकार त्यांना मदतही करत नाही. त्यामुळे जे शेतकर्‍याशी इमान राखत नाहीत, त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.
सरकारने आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. ग्रामीण आणि शहरी विभागातील शिक्षणाचा दर्जा पाहिला, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा शहरी विद्यार्थ्यांसमोर निभाव लागणार नाही. त्यामुळे नोकर्‍यांमध्ये ग्रामीण तरुणांचे स्थान अस्थिर होईल अशीही भीती पवार यांनी व्यक्त केली. मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत देशातले वातावरण बदलले आहे. मागील राज्यकर्त्यांबद्दल जनतेच्या काही तक्रारी होत्या. आत्ताच्या राज्यकर्त्यांना शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक यांच्याबद्दल काहीही घेणेदेणे नाही, अशी टीका त्यांनी केली.