Breaking News

शनीअमावस्येनिमित्त चार लाख भाविकांनी घेतले दर्शनसोनई/प्रतिनिधी


नवीन वर्षातील पहिल्याच शनिवारी शनिअमावस्या आल्याने नवीन वर्षाची सुरुवात शनिदर्शनाने घेण्यासाठी शनिशिंगणापूर येथे भाविकांचा जनसागर उसळला सुमारे चार लाख भाविकांनी शनिदर्शन घेतले. काल शनीअमावस्यानिमित्त शनिशिंगणापूर येथे महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन दर्शन घेण्यासाठी पहाटे पासूनच सुरुवात केल्याने दुपारनंतर भाविकांची अलोट गर्दी झाली. यावेळी पोलीस प्रशासनाने राहुरी शिंगणापूर रत्यावर मुळा कारखाना येथे वाहन पार्कींगची व्यवस्था केली होती. तसेच नगर-औरंगाबाद येथून येणार्‍या वाहनांसाठी शनैश्‍वर रूग्णालयाजवळ व्यवस्था केल्यामुळे मंदीर परीसरात तुरळक वाहन दिसत होते. त्यामुळे पायी चालणार्‍या भाविकांना गर्दीचा त्रास न झाल्यामुळे अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले.