विजयस्तंभाला अभिवादनासाठी लाखोंची गर्दीपुणे/ प्रतिनिधी 
कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंची गर्दी झाली होती. 
पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा 1 जानेवारी 1818 रोजी पराभव केला होता.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक सोमवारी रात्रीपासूनच गावात पोहोचले होते. गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली होती. 

दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केले. अद्यापपर्यंत दंगल घडवणार्यांवर सरकारकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण कसा होईल आणि दंगली कशा घडतील. हेच सरकार पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला. पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा 1 जानेवारी 1818 रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा 201 वर्षे पूर्ण झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी 1 जानेवारी रोजी देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा विजयस्तंभाच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी होती. 

गेल्या वर्षी अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने हिंसाचार झाला होता. कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी सोमवारी रात्री अकरापासून वाहतूक वळवण्यात आली होती. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळवली आहेत. नगरकडून हडपसरकडे येणारी वाहने शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा-केडगाव चौफुला-सोलापूर महामार्गावरून हडपसरकडे वळवली आहेत. पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने चाकणमार्गे किंवा खराडी बाह्यवळण रस्त्यावरून नगरकडे वळवली होती. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget