Breaking News

मुंबईतला 'बेस्ट' संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश


गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. कामगार नेते शंशाक राव यांनी संप मागे घेतल असल्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना 'वाढीव पगार जानेवारीच्याच पगारात मिळणार आहे', ही महत्त्वाची घोषणाही त्यांनी यांनी केली. वाढीव पगार आणि विविध मागण्यांसाठी बेस्टचा आजपर्यंतचा सर्वात मोठा संप अखेर मिटला आहे. 

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. वडाळा इथं शंशाक राव यांची मोठी सभा पार पडली. या सभेला बेस्टच्या कामगारांनी मोठी गर्दी केली होती. 'सरकारच्या समितीचे प्रस्ताव आपण धुडकावून लावले, थातुरमातुर आश्वासनांना आपण भुललो नाही', असं राव म्हणाले. 'मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यामुळे संप ताणण्यात काही अर्थ नाही', असंही त्यांनी कामगारांना समजवून सांगितलं.