दुर्गम भागात आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार : एकनाथ शिंदे


पालघर : राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जव्हार तालुक्याला अचानक भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. आरोग्य मंत्र्यांच्या या दौर्‍याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे दौर्‍याविषयी कुणालाच कल्पना नव्हती. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम जामसर, दाभेरी, साखरशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ऊपकेंद्र आणि पथकांना शिंदे यांनी भेट दिली.

जव्हार कुटीर रुग्णालयाचीही त्यांनी पाहणी केली. येथील रुग्णांची चौकशी करून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्र, ऊपकेंद्र आणि पथक या यंत्रणाच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील रुग्णांना खर्‍या अर्थाने सेवा दिली जाते. मात्र, येथे वैद्यकीय अधिकारी आणि संदर्भ सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका यांची गरज असल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या यंत्रणांचे बळकटीकरण करण्यासाठी आपण तातडीने कार्यवाही करणार असून आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील. असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या चार तालुक्यातील रुग्णांचा भार केवळ 100 खाटांचे जव्हार कुटीर रूग्णालयावर आहे. हे ऊत्तम रूग्णसेवा देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच येथे 200 खाटांच्या रुग्णालयाला मान्यता देऊन, त्यासाठी नव्याने ईमारत बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे व जव्हार येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

आरोग्यमंत्री बसले आणि खुर्ची तुटली
आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी जव्हार तालुक्याचा दौरा केला. या दौर्‍यात दाभेरी येथील आरोग्य केंद्रात डॉक्टरांशी चर्चा करत असताना ते बसलेली खुर्ची अचानक तुटली. खुर्ची तुटल्यामुळे ते तोल जाऊन पडत असतानाच, तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी लगेचच त्यांना सावरले. आरोग्य केंद्रातील या मोडक्या खुर्चीने दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेचे दर्शन घडवले अशी चर्चा या भागात या घटनेनंतर राहिली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget