Breaking News

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा घसरली


मुंबई : माथेरानची मिनी ट्रेन आज पुन्हा घसरल्याची माहिती समोर आली आहे. मिनी ट्रेनचे दोन डबे स्थानकावरच घसरले आहेत. दोन वर्षांपूर्वी बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, ही ट्रेन आज पुन्हा घसरली. ऐन हंगामातच ही घटना घडल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मे 2016 मध्ये माथेरानची मिनी ट्रेन आठवड्याभरातच दोन वेळा घसरली होती. यामुळे जवळपास वर्षभर दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या नावाखाली बंद असलेली ट्रेन 2017 मध्ये सुरु करण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा ही ट्रेन घसरली आहे.