Breaking News

दुशेरे ग्रामपंचायतीचा ’प्लास्टिक मुक्तीचा नारा’


कार्वे (प्रतिनिधी) : दुशेरे (ता. कराड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्लास्टिकमुक्त गाव करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी प्लास्टिकबंदी असलेल्या कॅरीबॅग पिशवीचा वापर टाळून पर्यायी पर्यावरण संतुलित कागदी पिशव्या तसेच कापडी पिशव्या वापरून गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सुमन जाधव यांनी केले आहे.

तसेच संपुर्ण गावामध्ये ग्रामपंचायतिच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सार्वजनिक ठिकाणे, गावातील रस्ते, हनुमान मंदिर परिसर, सहकारी संस्था इत्यादी ठिकानाहून प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. त्याचे विघटन करण्यात आले. 

त्याचबरोबर ग्रामस्थांच्यात स्वच्छता व प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती होण्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, हुतात्मा स्मारक परिसरातून पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी प्लास्टिक पिशव्या गावातुन हद्दपार करून पर्यावरण प्रबोधन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेविका जयश्री नलवडे, शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.