Breaking News

सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांवर पत्रकार दिनानिमित्त हभप राम झिंजुर्के यांचे प्रतिपादन


शेवगाव/प्रतिनिधी : सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांवर असून चांगल्या गोष्टी त्यांनी समाजापंर्यत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन हभप राम झिंजुर्के यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून झिजुंर्के महाराज बोलत होते.
       झिजुंर्के महाराज म्हणाले कि परिस्थितीचे सत्य अवलोकन करणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे.जे चांगले आहे त्याचे समाजात प्रबोधन झाले पाहिजे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर सारख्यांनी आपले जिवण अर्पण करुण राष्ट्राची उभारणी केली त्यांची आठवण ठेवायला पाहीजे. वृत्तपत्राच्या बातमीवर जनतेचा विश्‍वास असतो. पत्रकारांनी सत्यता समाजाबरोबर नेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात पत्रकारांना शाल, श्रीफळ, व सन्मान चिन्ह देऊण गौरविण्यात आले तर दिव्यांग संघटनेच्या वतीने डायरी व पेन देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार विनोद भामरे तर जि.प.सदस्य राहुल राजळे, रामभाऊ साळवे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक अरुण मुंडे, अशोक आहुजा, गणेश कोरडे ,भाजपाचे ज्येष्ठ नेते बापुसाहेब भोसले, भाजपा अध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, शिवसेना तालुका प्रमुख अ‍ॅड अविनाश मगरे, माजी सभापती अरुण लांडे, संजय फडके, बंडू रासणे, पंडित भोसले, राजेंद्र ढमढेरे, चेअरमन हनुमान पातकळ, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटागंरे, दत्तात्रय फुंदे, हमाल मापाडी अध्यक्ष एजाज काझी, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, उमेश भालसिंग, सरपंच भागवत लव्हाट, वैभव पुरनाळे, रासपचे आत्माराम पुंडकर, चांद शेख, उपसरपंच शंकर नाचन, लक्ष्मन काटे, सतिष लांडे, फुलचंद रोकडे आदि उपस्थित होते.