Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचारकोपरगाव/प्रतिनिधी

शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मागील एका वर्षापासून वेळेवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोपरगाव शहरात घडली आहे. आरोपीच्या नातेवाईकांनी पीडित तरुणीला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
यावेळी पीडित तरुणीने थेट कोपरगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.31/12/2017 पासून आरोपी सोमनाथ

निवृत्ती आहेर वय 21 रा. मोहनीराजनगर बेट याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीवर अत्याचार केले आणि आरोपीच्या नातेवाईकांनी पीडित तरुणीला शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. सदर पीडित तरुणीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली असून आरोपी सोमनाथ निवृत्ती आहेर याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे आणि शहर पोलिस

निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे करीत आहेत.