Breaking News

महिला आरोग्य तपासणी शिबीरास करंजेत प्रतिसाद


सातारा (प्रतिनिधी) : येथील करंजे पेठेतील श्रीपतराव पाटील हायस्कुलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ.स्नेहल पाटील, डॉ. कविता सुतार व डॉ. स्नेहल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच महिला आरोग्य शिबीर पार पडले. 

या शिबिरात सहभागी झालेल्या एकूण 120 महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्यतपासणी केली. शिबिराच्या उदघाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, सचिव तुषार पाटील, चेअरपर्सन वत्सला डुबल, संचालिका सौ. प्रतिभा चव्हाण, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्राचार्या सौ. सुनंदा शिवदास यांनी केले.