Breaking News

सी.एम.चषक बुलडाणा जिल्हास्तरीय सामन्यांचे आज मलकापुरात उद्घाटनबुलडाणा,(प्रतिनिधी): जिल्हा सी.एम. चषकाच्या जिल्हास्तरीय सामन्याचे उद्घाटन 18 जानेवारी रोजी क्रीडा संकुल, मलकापूर येथे भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, भाजप बुलडाणा जिल्हा अध्यक्ष धृपदराव सावळे, जि. प. अध्यक्ष उमाताई तायडे सी.एम.चषक जिल्हा संयोजक नरेंद्र शिंगोटे, जिल्हा महामंत्री मोहन शर्मा, सी.एम. चषक मलकापूर मतदार संघ संयोजक उत्कर्ष बक्षी व सहसंयोजक रोशन पांडव व जिल्ह्यातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती आ.चैनसुख संचेती यांनी दिली. येथील पत्रकार भवनात 16 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा महामंत्री मोहन शर्मा,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,रवी पाटील आदींची उपस्थिती होती. या वेळी आ.संचेती म्हणाले की, सीएम चषक कला-क्रीडा स्पर्धा आता अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. या स्पर्धेतील 288 विधानसभा पातळीवरचे सामने पूर्ण झाले असून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून सुमारे 42 लाख स्पर्धक आता या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. जिल्हा पातळीवरच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदार संघ असून सर्व विधानसभा मतदार संघामध्ये सी.एम. चषकचे सामने यशस्वीरीत्या संपन्न झाले आहेत. या सात मतदार संघामध्ये जवळपास 50,000 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या सातही मतदार संघामधील विजयी स्पर्धक हे आता जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये सहभागी होणार आहेत. हे सामने प्रत्येक जिल्ह्यात खेळले जाणार असून बुलडाणा या जिल्हास्तरीय सामन्याच्या बक्षीस वितरणाची तारीख दोन दिवसात ठरणार असून बक्षीस वितरणासाठी सर्व लोकप्रतिनिधी व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. असे बुलडाणा जिल्ह्याचे सीएम चषक जिल्ह्याचे पालक ना.चैनसुख संचेती यांनी माध्यमांना सांगितले. अंतिम स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे आणि मुख्यमंत्र्याची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र दिले जाणार आहे.