शासन दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी आणि महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख विसरणार्‍या मनुवादी सरकारचा जाहीर निषेध-ऍड.राऊत
बीड : प्रतिनिधी
राज्य सरकारने छापलेल्या शासन दिनदर्शिकेत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख न केल्याने हे सरकार मनुवादी वृत्तीचे असल्याचे सिध्द झाले असून सरकारच्या या मनुवादी वृत्तीचा जाहीर निषेध अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हा अध्यक्ष ऍड. सुभाष राऊत यांनी नोंदविला आहे. 
या बाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ऍड.सुभाष राऊत यांनी म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्राची ओळख ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांच्या आणि कार्याच्या महतीने सांगीतले जाते. मात्र युती सरकारकडून काढण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शासकीय दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिर्वाण दिनाचा उल्लेख नाही ही अत्यंत गंभीर बाब असून मनुवादी सरकारकडून महामानवांचा अवमान केला जात आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून वारंवार चुका होत असतांनाही संबंधितावर कुठलीही कारवाई होत नाही. युती सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील महापुरुषांचा अवमान केला जात आहे. 
भारत देशात समता प्रस्थापित होण्यासाठी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य वेचले. देशातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले आणि समाजात महत्वाचे स्थान मिळवून दिले. अशा महापुरुषांच्या पुण्यतिथी आणि महापरिनिर्वाण दिनाचा सरकारला विसर पडावा ही दुर्दैवी घटना आहे. सरकारकडून महामानवांचा होत असलेल्या अवमानामुळे सरकार मनुवादी व्यवस्थेचा पुरस्कार करते की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे या मनुवादी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन राज्य सरकारने माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या संबंधितांवर कारवाई करावी तसेच झालेली चूक दुरुस्त करुन पुन्हा नव्याने दिनदर्शिका प्रकाशीत करावी अशी मागणीही समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हा अध्यक्ष ऍड.सुभाष राऊत यांनी केली आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget