Breaking News

सांस्कृतिक स्पर्धेमध्ये पाटेगाव शाळा प्रथम


कुळधरण/प्रतिनिधी
कर्जत तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये सांस्कृतिक स्पर्धेतील लहान गटात पाटेगाव जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पाटेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी ’महाराष्ट्राची संतांची परंपरा’ हा कार्यक्रम त्यांनी उत्कृष्टपणे सादर केला. त्यात त्यांनी हे यश संपादन केले. जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा लवकरच होणार आहेत. 

गटशिक्षणाधिकारी सविता भोसले, गटविकास अधिकारी विनेश लाळगे, केंद्रप्रमुख शिवाजी बनसोडे तसेच पाटेगावचे सरपंच गोकुळ इरकर, अर्जुन महारनवर, नामदेव लाड, भागवत महारनवर आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक महादेव गांगर्डे, उज्वला लोंढे, सविता ढगे, अशोक नेवसे, अविनाश पवार, अतुल धालपे, मीनाकुमारी शेळके, सुलभा पोळ या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.