Breaking News

धुळयात आज पहिले विश्‍वकर्मा साहित्य संमेलन


धुळे : शहरात पहिले विश्‍वकर्मा साहित्य संमेलन रविवारी (दि. 13) होणार आहे. यातून साहित्यिकांना विविध साहित्याची मेजवाणी मिळेल, विश्‍वकर्मा साहित्य संमेलनानिमित्त दि. 13 जानेवारीला सकाळी 7.30 वाजता श्री विराट विश्‍वकर्मा आणि पुराणाची पालखी काढली जाईल. ही पालखी विश्‍वकर्मा मंदिर, कुंभार खुंट, जुने धुळेतून नाट्यगृहापर्यंत येईल. त्यानंतर गुजरात येथील दिव्यानंद बापूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. संमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चक्रपाणी चोपावर यांच्या हस्ते होईल. 


संमेलनाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबादचे परिवर्तनवादी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर असतील. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून पराग अहिरे असतील. या वेळी गाडीलोहार समाज विकास मंडळ, विश्‍वकर्मा युवा मंच, अखिल भारतीय तांबट जनशक्ती प्रतिष्ठान, विश्‍वकर्मावंशीय समाज संघटन, विश्‍वकर्मा समाज या पाच संस्थांतर्फे संमेलनाचे प्रमुख व साहित्यिक सुभाष अहिरे यांना साहित्यरत्न पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.