Breaking News

सातव्याप मजल्या वरुन पडून पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू्


मुंबई/ प्रतिनिधीः 
गोरेगाव पूर्वेकडील जॉगर्स पार्क, त्रिमूर्ती सोसायटीच्या टेरेसवरुन पडून पत्रकार आदर्श मिश्रा यांचा मृत्यू  झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मिश्रा यांचा मृत्यू इमारतीवरून पडून झाला, की त्यांनी आत्महत्या केली याचा गोरेगाव पोलिस तपास करत आहेत. आदर्श मिश्रा एका इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून काम करीत होते. मिश्रा हे या सात मजली इमारतीमध्ये राहत होते. रोज मॉर्निंगवॉक करण्यासाठी ते इमारतीच्या टेरेसवर जायचे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी टेरेसवर गेले असता टेरेसवरून खाली पडले. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेले; मात्र उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.