Breaking News

प्राचायार्ंंची विद्यार्थ्यांच्या पालकांना अपनामानास्पद वागणूक, जातीवाचक शब्द वापरून पालकांना काढले शाळेबाहेर


टिळकनगर/प्रतिनिधी
राहता तालुक्यातील टिळकनगर येथील डहाणूकर इंग्रजी शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थीनी मेघना पठारे हिची आई सुरेखा पठारे यांना शाळेतील प्राचार्य प्रियंका खराडकर व वंदना हरकल यांनी अपमानास्पद वागणूक देऊन, जातीवाचक शब्द वापरले, शाळेबाहेर हाकलून दिले गेले. याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस प्रशासनाने या दोन्ही महिला आरोपीस तात्काळ अटक करावी अन्यथा पोलिस प्रशासनास घेराव टाकू असा इशारा भीम शक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिला आहे.

पोलीस प्रशासनाने डहाणूकर उद्योग समूहाला पाठीशी घालण्याचे काम केले असून, गुन्हा दाखल करण्यास ही दिरंगाई केलेली आहे. आज रोजी गुन्हा दाखल होऊन पाच दिवसाचा कालावधी झाला असून, पोलीस प्रशासन घटनेचे गांभीर्य न ओळखता कासव गतीने कारवाई करत आहे. यापूर्वीही डहाणूकर इंग्रजी शाळेत फी साठी मागासवर्गीय विद्यार्थी पालकांना अनेकवेळा वेठीस पकडण्याचे काम या दोन्ही महिला आरोपींनी केले आहे. टिळकनगर येथील डहाणूकर इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांबद्दल शाळा प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी या अगोदर पालकांकडून करण्यात आल्या आहे. शाळेत सातपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. बहुतांश विद्यार्थी हे मागासवर्गीय असून, आजपर्यंत फी साठी अनेक विदयार्थीना शाळेतून हाकलून देऊन, वर्गात बसण्यास मज्जाव केलेला आहे, तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे या शाळेवर कोणतेही प्रकारचे नियंत्रण नसून, हुकूमशाही पध्दतीने शाळा व्यवस्थापन काम चालविला जात आहे. डहाणूकर उद्योग समूहाने घडलेल्या प्रकाराबद्दल शाळेतील प्राचार्य प्रियंका खराडकर व वंदना हरकल यांना बडतर्फ करण्याची शेवटी मागणी संदीप मगर सह फी साठी पालकांना वेठीस धरणार्‍या विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.

 शाळेवर डहाणूकर ट्रस्टचे नियंत्रण......


डहाणूकर शाळेतील विद्यार्थीनी मेघना पठारे फी संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळेची कसून तपासणी केली आहे. त्याचा संपूर्ण गोपनीय अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केलेला असून, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी प्रा. प्रियंका खराडकर, वंदना हरकल यांच्यावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला बडतर्फाची कारवाई करता येणार नाही, कारण शाळेवर मालती डहाणूकर ट्रस्टचे नियंत्रण आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल झालेला अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागास प्राप्त झाल्यास शिक्षण विभाग संस्थेला संबंधितांना बडतर्फ करण्याचे आदेश देईल.


-रामदास खेडकर
-उपशिक्षण अधिकारी
-अहमदनगर जिल्हा परिषद