Breaking News

पाथर्डी नगरपालिकेत ठिय्या आंदोलनाला सुरवात

पाथर्डी नगरपालिकेत ठिय्या आंदोलनाला सुरवात मुख्याधिकारी कक्षात चर्चेला सुरवात.नगरपालिका कार्यलयाच्या शेजारील अतिक्रमण काढुन गाळे सील करा तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका.


पाथर्डी (प्रतिनिधी) अभिजीत खंडागळे : पाथर्डी शहरातील नगरपरिषद हद्दीतील व नगरपरिषदेच्या भूखंडावरील धनधाडग्यांनी व राजकीय पुढाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे आश्वासन देऊनही न काढल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध म्हणून नगरपालिका कार्यलयात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरवात झाली आहे.तहसीलदार नामदेव पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,१९ तारखेला रास्ता रोको आंदोलनामध्ये आश्वासन दिले होते की,गरीबाच्या अतिक्रमणाबरोबरच समन्यायी पद्धतीने कोणत्याही पदाधिकाऱ्याचा,राजकारण्याचा किंवा धनदांडग्यांचा विचार न करता सर्वांना समान न्यायाने अतिक्रमणे काढण्यात येतील.कुठल्याही स्वरूपात भेदभाव केला जाणार नाही.परंतु आपण आपला तो शब्द न पाळता गेल्या आठ दिवसापासून चालू असलेल्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत बाबत शंका येण्याची जागा ठेवली आहे.जे हातावर पोट भरतात हातगाडीवाले पथारीवाले व सामान्य नागरिक आहेत त्यांनी सर्व अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतले आहे हा आपल्यावरचा विश्वास जनतेने सिद्ध केला.

परंतु आपण त्यांच्या विश्वासाला हरताळ फासला असून श्रीमंताची पुढाऱ्यांची राजकीय पाठबळ असणाऱ्यांची भूखंडावरील अतिक्रमणे आपण काढले नाही.त्यांच्याबाबत वेळकाढूपणा आपण करत असून सामान्य माणसाला एक न्याय व धनदांडग्याना माणसाला एक न्याय आपल्याकडून झालेला आहे.हे यावरून सिद्ध होत आहे त्यामुळे सामान्य जनतेत आपल्या दुटप्पी भूमिकेमुळे प्रचंड रोष निर्माण झालेला आहे त्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे पाथर्डी शहरातील टपरीधारक गोरगरीब हातगाडीवाले यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तरी आपण १ जानेवारी पर्यत सर्वाना समान न्याय देत जातीने लक्ष्य घालून अतिक्रमण काढावीत अन्यथा आतापर्यंत अतिक्रमण काढलेल्या गोरगरिबाची संघटनेच्या वतीने वाजत गाजत पूर्ववत अतिक्रमणे करून आपल्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत विस्थापित झालेल्या गोर गरिबांना पुन्हा त्या जागेवर बसविण्यात येईल याची नोंद घ्यावी.अन्यथा टपरीधारक,गोरगरीब, हातगाडीवाले व पथारीवाले यांच्या बायका,मुलांबाळासह तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह २ जानेवारी रोजी नगरपरिषद कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.