Breaking News

अवयव दानासाठी सक्रिय राहावे : कोमल पवार


कराड (प्रतिनिधी) : साधारण दीड वर्षापूर्वी मला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यानंतर प्रकृती खूपच खालावली. मृत्यशी झुंज सुरू असताना माझ्यावर चेन्नईत हृदय अणि फुप्फुसे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया यशस्वी झाली. केरळमधील एका 16 वर्षाच्या मुलाचे हृदय अणि फुप्फुसे मला शस्त्रक्रियेने बसविण्यात आली आहेत. त्या मुलांचे हृदय अणि श्‍वास घेऊन मी उभी आहे. आज महाराष्ट्रात किडणीआजाराचे दोन लाख रूग्ण आहेत. मात्र दान करणारे कुणीच नाही. त्यापुढे तुम्ही अवयव दानासाठी काम करा, त्याचे महत्व सांगा, असे आवाहन कोमल पवार -गोडसे यांनी केले.


घारेवाडी (ता. कराड) येथे सुरु झालेल्या बलशाली युवा हृदय संमेलनास राज्यासह परराज्यातील तरुणाईपुढे त्या बोलत होत्या. या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजीत देशमुख, शिवमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंतनु कुलकर्णी, उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह शिवमचे संचालक उपस्थित होते. तत्पुर्वी विवेक वेलणकर यांनी त्यांच्या व्याख्यानात माहीती अधिकार कायदा हा लोकशाहीतील अमोघ अस्त्र असुन त्याचा उपयोग जरुर करा, असे आवाहन केले. सायंकाळी अधिकराव कदम यांचे हिमालयावर येता घाला, सह्याद्री हा धावुनी गेला या विषयावर व्याख्यान झाले. आज सकाळी विवेक सावंत यांचे कृत्रिम बुध्दीमत्ता आणि उद्याचे शिक्षण या विषयावर तर दुपारी जळगाव येथील दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांचे चांगला माणुस घडण्यासाठी या विषयावर व्याख्यान झाले. सायंकाळी शून्यातून विश्‍व निर्माण केलेले उद्योगपती रामदास माने यांचे असा घडतो उद्योजक या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झाले.