Breaking News

गॅस गळतीमुळे स्फोट पॅरिस हादरले; अनेक जखमी


पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस शहर शनिवारी शक्तिशाली स्फोटाने हादरले. हा स्फोट पॅरिस शहराच्या मध्यवर्ती भागात एका बेकरीत झाला. त्यामुळे अनेकजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असून त्यामुळे मोठी आग लागली. 

हा स्फोट इतका शक्तिशाली होता, की यामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. आगीमुळे सगळीकडे धुराचे लोट पसरले आहेत. ज्या ठिकाणी स्फोट झाला आहे, त्या ठिकाणी आपत्कालीन सेवा दलाचे कर्मचारी बचावकार्य करत आहेत. सेंट सिसिले आणि रुआ दी ट्रिवाईज रस्त्यावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बेकरीत हा स्फोट झाला. हा भाग नेहमी लोकांनी गजबजलेला असतो. स्फोटामुळे अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी 140 फायर फायटर्स आग शमवण्याचे काम करीत आहेत.