Breaking News

नगरपालिकेच्या विषय समितीच्या सभापतीची बिनविरोध निवड


देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विषय समितीच्या सदस्य व सभापतीची बिनविरोध निवड करण्यात आली. बांधकाम बाळासाहेब खुरूद, पाणीपुरवठा अजंली कदम, आरोग्य कमल सरादे, महिला व बालकल्याण संगीता चव्हाण आदींची समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्या अध्यक्षेतेखाली विषय समित्या व सभापती पदाची निवड करण्यात आली. गुरूवार रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी वेळ देणेत आली होती. त्यानुसार आलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी करून दुपारी 12 नंतर नामनिर्देशन मागे घेणेसाठी 15 मि.चा कालावधी देण्यात आला. पंरतू प्रत्येक समितीसाठी एकच नामनिर्देशन पत्र आल्याने कोणत्याही सदस्याने नामनिर्देशन मागे न घेतल्याने विषय समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.

विषय समितीचीं निवड- नियोजन व विकास समिती - प्रकाश संसारे (सभापती), सचिन ढुस, आण्णासाहेब चोथे, आदिनाथ कराळे, केशरबाई खांदे सर्व सदस्य. अर्थ व सार्वजनिक बांधकाम समिती - बाळासाहेब खुरूद (सभापती), ज्ञानेश्‍वर वाणी, नंदा बनकर, बेबी मुसमाडे, केशरबाई खांदे सर्व सदस्य. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती-अजंली कदम (सभापती), उर्मिला शेटे, सुजाता कदम, आण्णासाहेब चोथे, आदिनाथ कराळे सर्व सदस्य. स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण, क्रिडा, सांस्कृतिक कार्य समिती-कमल सरादे (सभापती), सचिन ढुस, आदिनाथ कराळे, उर्मिला शेटे, नंदा बनकर सर्व सदस्य. महिला व बालकल्याण समिती - संगीता चव्हाण (सभापती), बेबी मुसमाडे, नंदा बनकर, सुजाता कदम, केशरबाई खांदे सर्व सदस्य. स्थायी समिती-सत्यजित कदम (नगराध्यक्ष तथा पदसिध्द सभापती), प्रकाश संसारे, (उपनगराध्यक्ष तथा पदसिध्द सभापती), बाळासाहेब खुरूद(सभापती बांधकाम), अंजली कदम (सभापती पाणीपुरवठा), कमल सरादे (सभापती स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य), संगीता चव्हाण (सभापती महिला व बालकल्याण), आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्यांनतर पिठासिण अधिकारी, उपजिल्हाधिकारी वामन कदम, यांनी आभार मानताना सांगितले की, सर्व सदस्यांनी खेळी- मेळीच्या वातावरणात पार पडल्या बाबत सर्वाचे आभार व्यक्त केले. तर नगराध्यक्ष सत्यजित कदम पा. यांनी नवर्निवाचीत सभापतीचा सत्कार करून समितीचा कारभार चांगल्या प्रकारे करावा असे आव्हान केले. विषय समितीच्या निवडीचे कामकाज मुख्याधिकारी नाना महानवार, कार्यालयीन अधिक्षक बन्सी वाळके, सभाकामकाज लिपीक मुंकुंद ढुस यांनी सहकार्य केले.