Breaking News

भगवानबाबा पुतळाविटंबनाप्रकरणी बोधेगावात निषेध


 शेवगाव/प्रतिनिधी आखिल मानव जातीचे दैवत संत भगवानबाबा यांच्या पुतळ्याची भाळवणी येथे समाजकंटकांनी केलेल्या विटंबनाच्या निषेधार्थ बोधेगावत तीव्र पडसाद उमटले. येथील सर्व पक्षिय तरुणांनी ऋषिकेश ढाकणे यांच्या नेतृत्वखाली घटनेचा मुख्य आरोपी स्वप्नील शिंदे याची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढुन बन्नोमा दर्ग्यासमोर त्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी जमाव संतप्त झाला होता. भगवानबाबांचा जयजयकार करीत तरुणांनी आपला मोर्चा बोधेगाव पोलिस दुरक्षेत्राकडे वळवला. याठिकाणी जाहिर निषेध सभा घेण्यात आली.   

 यावेळी बोलताना ऋषीकेश ढाकणे म्हणाले कि, भगवानबाबांचा पुतळा जाळुन त्यांचे विचार नष्ट होणार नाहीत. समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून हा  प्रयत्न समाज कधीही यशस्वी होऊ देनार नाही. ज्या समाजकंटकाने घाणेरडे कृत्य केले असेल त्याच्यावर प्रशासनाने कडक कार्यवाही करावी. अशी मागणी केली. यावेळी भाऊराव    भोंगळे, अनिल कांबळे, माणिक गर्जे, बाबा पठाण, प्रमोद विखे, संजय वडते यांची भाषणे झाली. यावेळी रामजी अंधारे, रमेश गर्जे, अय्युब शेख, सचिन वाघ, शहाजी जाधव,    अविनाश गर्जे, गणेश गर्जे, बाबा गर्जे, किरण दराडे, श्रीकृष्ण ढाकणे, प्रकाश गर्जे, सचिन वाघ, बळी चेमटे, कृष्णा चेमटे, उमेश चेमटे, बाळकृष्ण खेडकर, पोपट ढाकणे, आ   जिनाथ बडधे, वैभव खेडकर, अमोल केकाण, नवनाथ खेडकर, पोपट ढाकणे, दिनेश बटुळे, संपत ढाकणे, पांडुरंग ढाकणे, सौरव खेडकर, विजय मुंढे, विशाल गर्कळ, महेश केदार,    आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस हवालदार बबनराव राठोड यांना निवेदन देण्यात आले.