स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे यांचे नागरिकांना आवाहन


बुलडाणा,(प्रतिनिधी): देशभर 1 ते 31 जानेवारी या दरम्यान स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा राबवण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबाने सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव लौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस. व अध्यक्षा उमा तायडे यांनी केले केले आहे. 

सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने 1 ते 31 जानेवारी दरम्यान देशभर स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा राबवण्यात येत आहे. या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात, त्यांना स्वच्छता विषयी अभिमानास्पद स्वामित्वाची भावना निर्माण व्हावी. तसेच स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात हा आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या शौचालयाला नव्याने रंग देऊन स्थानिक कलांच्या माध्यमातून त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहून तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचा लोगो काढणे अपेक्षित आहे. यामध्ये कुटुंब प्रमुखाने स्वनिधीतून शौचालय रंगवणे अपेक्षित आहे. तसेच जेथे शक्य आहे, तेथे सीएसआरची ही मदत घेतली जाऊ शकते. तसेच विविध शासकीय योजनेच्या समन्वयातून स्पर्धेत ग्रामस्थांना सहभाग घेता येऊ शकतो. यासाठी अधिकारी, पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. स्पर्धेची सुरुवात उद्या 1 जानेवारी रोजी होणार आहे. ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून जिल्ह्याचा नावलौकिकासाठी प्रयत्न करायचा आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रंगवलेल्या शौचालयाच्या टक्केवारी नुसार राज्यातील तीन उत्कृष्ट जिल्हे निवडले जातील. हे तीन जिल्हे त्या त्या जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायती निवडणार आहेत. ज्यांनी कल्पकतेने शौचालय रंगवलेला असेल, त्या पाच ग्रामपंचायत मधील छायाचित्र राज्यस्तरावर पाठवायचे आहेत. राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या फोटो आणि माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्तरासाठी राज्यस्तरावर नामनिर्देशन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी आहे. त्यामुळे जिल्ह्याकडून रंगवलेले छायाचित्राची गावनिहाय व तालुकानिहाय छायाचित्रासह माहिती 30 जानेवारी पर्यंत पाणी व स्वच्छता साहाय्य संस्थेकडे पाठवणे आवश्यक आहे. याची निवड राष्ट्रीय स्तरावर पाणी व स्वच्छता मंत्रालयाच्या गठीत समितीकडून होणार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget