कोणत्याही संतांनी, राष्ट्रपुरुषांनी जात मानली नाही - झिंजुर्केशेवगाव श./प्रतिनिधी 
कोणत्याही राष्ट्रसंतानी त्यांनी कधी आपली जात सांगितली नाही. परंतु आपले हितसंबंध जोपासणार्‍या राजकारणी धुरीणांनी संत आणि राष्ट्रपुरुष वाटून घेतले. आजही या विचारसरणीला मुठमाती देण्याचे कार्य संत आपल्या कीर्तन प्रवचनातून करतात. आपणा सर्वावर आणि प्रामुख्याने पत्रकारांवर या जनजागरणाची मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आखेगाव येथील संत जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख राम महाराज झिंजूर्के यांनी केले. पुणे येथील संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या चोखोबा ते तुकोबा-एक वारी समतेची हा वसा घेऊन निघालेल्या दिंडीच्या स्वागताच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

पैठण रस्त्यावरील लक्ष्मी मातेच्या मंदिरात एक जानेवारीला मंगळवेढ्याहून देहुला निघालेल्या वारीचे शेवगाव येथे आगमन झाले. यावेळी वारी समवेत-चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची-या वारी अभियानाचे अध्यक्ष अर्थतज्ञ ज्येष्ठ उद्योजक डॉ. डी.एस.काटे, निमंत्रक सचिन पाटील, विजयसिंह जगदाळे, रामप्रभू जाधवर, रोहित मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते. नगराध्यक्ष राणी मोहिते यांचे पती विनोद मोहिते, जगदीश धूत, डॉ. कृष्णा देहद्रय, डॉ. सुरज लांडे, विनोद ठाणगे, नितीन तागड, संदीप जावळे, चंद्रकांत मोहिते, केशव भुजबळ, बंडू रासने, ज्ञानदेव वंजारे, अनिल बोरुडे, संजय गंगावणे, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ह.भ.प राम महाराज म्हणाले, समता म्हणजे सर्वांचा प्राण. बंधुता म्हणजे आपण एकमेकांचे बांधव आहोत. मानवता म्हणजे सर्व मानव एकाच ईश्‍वराची लेकरं आहेत ही भावना समाजात मनामनात रुजली पाहिजे. काटे म्हणाले, सातशे वर्षांपूर्वी संतांनी दिलेली समतेची, ममतेची व बंधुत्वाची शिकवण आपण विसरत आहोत. अद्यापही संताचा हा विचार आत्मसात. करण्याची गरज आहे. या जनजागरणासाठी एक वारी समतेची या अभियानाच्या माध्यमातून समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही वारकरी निघालो असल्याचे सांगून 12 जानेवारीला देहू येथे वारीची सांगता होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. समितीचे कार्यकर्ते भरत अमदापुरे यांनी प्रास्ताविक केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget