Breaking News

प्रीतिसंगम संगीत महोत्सवाची कराडमध्ये पर्वणी


कराड (प्रतिनिधी) : सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे व प्रख्यात सरोदवादक पंडित निभंजन भट्टाचार्य या नामवंताच्या सहभाग दि. 28 व 29 जानेवारी 2019 रोजी प्रीतिसंगम संगीत महोत्सव होत आहे. 

यंदाच्या प्रितीसंगम संगीत महोत्सवात दि. 28 व 29 जानेवारी या कालावधीत दररोज रात्री साडेआठ वाजल्यापासून सौ. वेणुताई चव्हाण सांस्कृतीक सभागृहात होणार आहे. या महोत्सवाची सुरूवात सुप्रसिध्द गायिका सावनी शेंडे, यांच्या गायनाने होणार आहे. ठुमरी व दादरा ऐकण्याचा लाभ रसिकांना मिळणार आहे. त्यांना तबल्यावर हणमंत फडतरे व उदय कुलकर्णी हे संवादीनीवर साथसंगत देणार आहेत. दि. 29 रोजी ख्यातनाम सरोद वादक पं. निभंजन भट्टाचार्य, कलकत्ता यांचे सरोद वादन होणार आहे. हे दर्जेदार कार्यक्रम विनामूल्य उपलब्ध करण्यात येत असून प्रीतिसंगम संगीत महोत्सव हा कराडच्या सांस्कृतिक परंपरेतील एक मानबिंदु आहे. या महोत्सवात कराड व परिसरातील रसिकांनी उत्फूर्त प्रतिसाद देवून या नामवंत कलाकारांच्या कलाविष्काराचा रसिकांनी अस्वाद घ्यावा, असे आवाहन जिमखान्याचे जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी केले आहे.