Breaking News

शासकीय खरेदी केंद्र ताबडतोब सुरू करा, थकीत चुकारे तात्काळ द्या!


चिखली,(प्रतिनिधी): चिखली तालुक्यातील शेतकार्‍यांना शासनाच्या योजना अमलबजावनीत होणारा त्रास व त्यामुळे शेतकीर्‍यांची होणारी अडचण लक्षात घेता त्यावर तातडीने उपाय योजना करावी, यासाठी चिखली काँग्रेसच्या वतीने तहसिदार यांना निवेदन देवुन शेतकर्‍यांच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले असुन लवकरच प्रश्‍न मार्गी न लागल्यास काँगे्रसच्या वतीने  तिव्र आंदोलन करण्याचा इशारा चिखली तालुका काँगे्रसचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंरद यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.       

निवेदनानुसार चिखली येथील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर मागिल वर्षी तुर व उडीद या पिकांची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी 1115 क्विंटल शेतमाल खरेदी केल्या नंतरही ऑनलाईन नोंदणी संबंधीत खरेदी यंत्रणेने न केल्यामुळे या शेतकर्‍यांना अदयापपर्यंत त्यांचे चुकारे मिळालेले नाही. तरी या चुकीस जबाबदार असलेल्या संबंधीतावर कार्यवाही करून शेतकर्‍यांना त्यांचे हक्काचे पैसे देण्यात यावे. मागिल तुरीची नोंदणी होवुनही नाफेड ने तुरी खरेदी केल्या नाहीत, अशा शेतकर्‍यांना त्यांच्या तुरी मिळेल त्या भावात बाजारात विकाव्या लागल्या, त्यांना शासनाने 1000 हजार रूपये भाव फरक अनुदान स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे. मात्र अदयाप पर्यंत एकाही शेतकर्‍याला हा भाव फरक मिळालेला नाही तो तात्काळ मिळावा. यावर्षी अदयापपर्यंत तुरीची नाव नोंदणी सुरू झालेली नाही, तर शासकीय खरेदी केंद्रही सुरू करण्यात आलेले नाही. शेतकर्‍यांचा शेतमाल घरात आला असुन बाजारात त्यांच्या शेतमालाला शासनाने ठरवुन दिलेला हमी भाव मिळत नाही. तरी हा अन्याय दुर करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावेत, त्याचबरोबर नोंदणीची प्रक्रीया ही सुरू केली जावी. या मागण्यां बरोबरच यावर्षी पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे परीसरातील भाजीपाला, हरबरा, मिर्ची, हळद, फळबागा, आदी पिके नष्ट झाल्यात जमा आहे. या आस्मानी संकटात शेतक-यांना दिलासा मिळावा म्हणुन तातडीने या पिकांचे सव्र्हेक्षण करून शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत मिळावी. हया प्रमुख मागण्या  निवेदनाव्दारे करण्यात आल्या. उपाय योजना न झाल्यास चिखली कॉगे्रसच्या वतीने शेतकर्‍यांसह तिव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आलेला आहे.       

निवेदन देतेवेळी तालुका काँगे्रसचे निरीक्षक गणेशराव पाटील, तालुका कॉगे्रसचे अध्यक्ष विष्णु पाटील, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, बाजार समितीचे सभापती सचिन शिंगणे, उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, अशोकराव पडघान, डॉ. सत्येंद्र भुसारी, शिवनारायण म्हस्के, युवक कॉगे्रसचे रमेश सुरडकर, सेवादलचे गजानन परीहार, रूपराव पाटील, पंजाबराव अंभोरे, सुभाषसेठ करंडे, भास्कर काकडे, साहेबराव आंभोरे, समाधान गिते, राजेंद्र सुरडकर, भिमराव महाराज हिवरकर, संजय गिरी, कापडसिंग पाटील, सुनिल पवार, यांच्या अनेक कॉगे्रसचे विविध सेलचे पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.