Breaking News

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सागर काळवाघे उर्वरीत कार्यकारिणी लवकरचबुलडाणा,(प्रतिनिधी)ः मागील तीन वर्षांपासून बुलडाण्यात सर्वसमावेशक आणि सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात येत असून यावर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सागर काळवाघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या जयंती उत्सवाला ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या भव्य-दिव्य बनविण्याच्या उद्देश्याने तसेच प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा उत्सव लोकोत्सव व्हावा, यासाठी तमाम शिवप्रेमींनी  सज्ज व्हावे, असे आवाहन अध्यक्ष काळवाघे यांनी केले आहे.

तसेच लवकरच समितीची उर्वरीत कार्यकारिणी जाहीर केली जाईल, अशीही माहिती अध्यक्षांनी दिली आहे. येथील विश्राम भवनमध्ये यासंदर्भात शनिवारी सायंकाळी शिवप्रेमींची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला सार्वजनिक शिवजयंती समितीचे पदसिद्ध सचिव सुनिल सपकाळ तथा मावळते अध्यक्ष डॉ. राजेश्‍वर उबरहंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, प्रा. सुनिल देशमुख, प्रा. डॉ. अनंत शिरसाट, विधीज्ञ ऍड. जयसिंगराजे देशमुख, सौ. वंदनाताई निकम, प्रा. सौ. अंजलीताई परांजपे, व्याख्याता दिपाली सुसर, गायत्री सावजी, पत्रकार रणजीतसिंग राजपूत, प्रा. अनिल रिंढे, डॉ. मनोहर तुपकर, अदिती अर्बन परिवाराचे अध्यक्ष सुरेश देवकर, छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष भारत शेळके, शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील, भाजप नेते डॉ. रामदास भोंडे, न.प. सभापती उमेश कापुरे, नगरसेवक आशिष जाधव, कैलास माळी, नाभिक महामंडळाचे राजेश नाईकवाडे, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, राष्ट्रवादीचे महेश देवरे, अनिल बावस्कर, मराठा महासंघाचे गजानन माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, पवन देशमुख, महामानव ग्रृपचे सुमित गायकवाड, शिक्षक संघाचे राजाराम दांदडे, किसान सेनेचे लखन गाडेकर इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविकातून सुनिल सपकाळ यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या परंपरेचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माला सोबत घेवून कल्याणकारी राज्य स्थापिले. सर्व समाजाला जोडणारी शिवजयंती साजरी करण्यासाठी आपण प्रतिबद्ध असल्याचे सांगत सपकाळ यांनी नवीन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडला. अध्यक्षपदासाठी इच्छूकांपैकी सागर काळवाघे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

 उर्वरीत कार्यकारिणीची घोषणा लवकरच केली जाईल, असे नवनियुक्त अध्यक्ष सागर काळवाघे यांनी जाहीर केले. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीची शिवजयंती आगळी वेगळी आणि समाजाला दिशा देणारी साजरी करूया, असे आवाहनही काळवाघे यांनी केले. यावेळी मागील शिवजयंतीच्या जमा-खर्चाचा हिशोब डॉ. उबरहंडे यांनी सादर केला. या बैठकीला मोहन पर्हाड, अनुप श्रीवास्तव, चंद्रकांत काटकर, सचिन परांडे, राहुल हिवाळे, गोपाल निळकंठ, अनिरूद्ध खानजोडे, संजय खांडवे, कुणाल गायकवाड, विठोबा इंगळे, गौरव देशमुख, निलेश हरकल, प्रा. सुनिल जवंजाळ,उत्कर्ष डाफणे, किरण देशपांडे, सागर चव्हाण, संदीप गावंडे, सतीश बरडे, लखन जाधव, दिपक तुपकर, श्रीकांत गायकवाड, मलय बोरकर, अरूण टेकाळे, गजानन सुरोशे, युवराज वाघ, अजय मुठ्ठे, शैलेश शर्मा आदि मान्यवरांचीही उपस्थिती होती.