Breaking News

जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा


श्रीनगर : कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी शनिवारी आमने सामने आले. यात 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैनिकांना यश आले. काटपुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. त्यानंतर, येथे शोध मोहीम राबविण्यात आली.

दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर काटपुरा भागाची शनिवार संध्याकाळी नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच, शोध घेण्यात आला, अशी माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली. शोध अभियान सुरू असताना दहशतवाद्यांनी समोरुन गोळीबार केला. त्यानंतर, सुरक्षा दलाने प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात दोघे ठार झाले. घटनास्थळावरून शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते हे अजून कळू शकले नाही.