Breaking News

जिजामाता महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरणभेंडे/प्रतिनिधी
भेंड़ा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर पाच दिवसापासून सुरु असलेल्या जिल्हास्तरीय लोकनेते मारूतरावजी घुले पाटील क्रिड़ा प्रबोधनी आयोजित चषक 2019 क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी मिसाळ अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. मिसाळ म्हणाले की, सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी खेळाचे महत्व अधिक आहे. ग्रामीण भागात सुविधा नसतानाही दर्जेदार खेळाडू तयार होत आहेत. अशा प्रबोधनींना शासनाने पाठबळ देण्याचे कर्तव्य पार पाडावे असे ते म्हणाले या स्पर्धा भरवण्यासाठी क्रिड़ा प्रबोधनीचे विशेष परिश्रम घेतल्याबदल त्यांचे ही अभिनंदन केले. यावेळी अंबादास गोंडे, प्रा.भारत वाबळे, शरद आरगडे, सुदाम कापसे, दादासाहेब गजरे, राजु आरगडे, सलमान शेख, नागेश पवार, सचिन बानकर, शोयब शेख, अंबादास गिते, अशोक दुकळे, बाळासाहेब नागरगोजे , सुहास गायकवाड,आदी उपस्थित होते.